99. अज् जिलजाल - ٱلزَّلْزَلَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल
- आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील
- आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे?
- त्या दिवशी ती आपले (वरील घडलेले) अहवाल निवेदन करील
- कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला (असे करण्याची) आज्ञा दिलेली असेल
- त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील.
- मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील.
- आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील.
Tags:
099. Surah Az-Zalzalah