100. अल् आदियात - ٱلْعَادِيَات
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे त्या (घोड्यांची)
- जे फुत्कार टाकीत धावतात मग (आपल्या टापांनी) ठिणग्या उडवितात.
- मग सकाळी सकाळी छापा मारतात.
- मग त्या प्रसंगी धुळीचे लोट उसळतात.
- मग अशा स्थितीत एखाद्या जमावात शिरतात.
- वस्तुस्थिती अशी आहे की मानव आपल्या पालनकर्त्याशी फार कृतघ्न आहे.
- आणि तो स्वतः याला साक्षी आहे.
- आणि तो धनदौलतीच्या प्रेमात तीपपणे गुरफटलेला आहे.
- तर काय तो त्या वेळेला जाणत नाही जेव्हा थडग्यात जे काही (दफन केलेले आहे) ते काढले जाईल
- आणि हृदयात जे काही (लपलेले) आहे ते काढले जाऊन त्याची तपासणी केली जाईल?
- निश्चितच त्यांचा पालनकर्ता त्या दिवशी त्यांच्याशी चांगलाच परिचित असेल.