101. अल् कारिआ: - ٱلْقَارِعَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- प्रचंड घटना!
- काय आहे ती प्रचंड घटना?
- तुम्हाला काय ठाऊक की ती प्रचंड घटना काय आहे?
- तो दिवस जेव्हा लोक विखुरलेल्या पतंग्यांसमान
- आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरीप्रमाणे असतील.
- मग ज्याचे पारडे जड असेल
- तो मनपसंत ऐश्वर्यात असेल,
- आणि ज्याचे पारडे हलके असेल
- त्याचे विश्रामधाम खोल खाई असेल,
- आणि तुम्हाला काय ठाऊक की ती वस्तू काय आहे?
- भडकणारा अग्नी.