102. अत् तकासुर - ٱلتَّكَاثُر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- तुम्हा लोकांना अधिकात अधिक आणि एकदुसर्यापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे
- इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहचता,
- कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल
- पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल,
- कदापि नाही, जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता (तर तुमचे वर्तन असे नसते).
- तुम्ही नरक पाहणारच!
- पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने तो पहाल.
- मग जरूर त्या दिवशी या देणग्यांसंबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल.