95. अत् तीन - ٱلتِّين
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे अंजीर व जैतुनची,
- आणि तुर-ए-सीना
- आणि या शांततापूर्ण (मक्का) शहराची,
- आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केले,
- मग उलट फिरवून आम्ही त्याला निकृष्टात निकृष्ट करून टाकले,
- त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्ये करीत राहिले की त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे.
- तर (हे पैगंबर (स.)) यानंतर कोण मोबदला व शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला खोटे ठरवू शकतो?
- काय अल्लाह सर्व शासकांपेक्षा मोठा शासक नाही?