94. अलम नशर: - أَلَمْ نَشْرَحْ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- (हे पैगंबर (स.)) काय आम्ही तुमचे मन तुमच्यासाठी उघडले नाही?
- आणि तुमच्यावरून ते भारी ओझे उतरविले
- जे तुमची कंबर खचवीत होते.
- आणि तुमच्याखातर तुमच्या लौकिकाचा नाद दुमदुमला.
- तर वस्तुस्थिती अशी आहे की, अडचणीबरोबर संपन्नताही आहे.
- निःसंशय अडचणींबरोबर संपन्नताही आहे.
- म्हणून जेव्हा तुम्ही मोकळे व्हाल तेव्हा उपासनेच्या परिश्रमात लागा
- आणि आपल्या पालनकर्त्याकडेच ओढ ठेवा.