93. अज् जुहा - ٱلضُّحَىٰ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे प्रकाशमान दिवसाची
- आणि रात्रीची जेव्हा ती शांतपणे पसरते.
- (हे पैगंबर (स.),) तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुळीच सोडलेले नाही आणि तो नाराजही झाला नाही.
- निश्चितच तुमच्यासाठी नंतरचा काळ अगोदरच्या काळापेक्षा उत्तम आहे.
- लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला इतके देईल की तुम्ही प्रसन्न व्हाल.
- काय त्याने तुम्हाला अनाथ पाहिले नाही. मग त्याने ठिकाण उपलब्ध करून दिले?
- त्याने तुम्हाला मार्गभ्रष्ट पाहून मार्गदर्शन केले.
- आणि तुम्ही गरीब आढळला. आणि मग श्रीमंत केले.
- म्हणून अनाथावर सक्ती करू नका,
- आणि याचकाला झिडकारू नका.
- आणि आपल्या पालनकर्त्याच्या देणगीची अभिव्यक्ती करा.