97. अलकद्र - ٱلْقَدْر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे.
- आणि तुम्हाला काय माहीत, ’कद्र’ची रात्र काय आहे?
- कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
- दूत आणि रूह (जिब्रिल (अ.)) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात.
- ती रात्र पूर्णतः ’शांती’ आहे. उषःकाळापर्यंत.