107. अल् माऊन - ٱلْمَاعُون
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- तुम्ही पाहिले त्या माणसाला जो परलोकातील मोबदला व शिक्षेला खोटे ठरवितो?
- तोच तर आहे जो अनाथाला धक्के देतो
- आणि गरिबांना जेवण देण्यासाठी उत्तेजन देत नाही.
- मग विनाश आहे त्या नमाज पढणार्यांसाठी
- जे आपल्या नमाजात गफलत करतात.
- जे दिखाऊपणा करतात,
- आणि क्षुल्लक गरजेच्या वस्तू (लोकांना) देण्यास टाळाटाळ करतात.