104. अल् हुमजा: - ٱلْهُمَزَة
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- विनाश आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याला लोकांना टोमणे मारण्याची व (पाठीमागे) निंदा करण्याची सवय आहे,
- ज्याने धन गोळा केले आणि मोजून मोजून ठेवले.
- तो समजतो की त्याचे धन सदैव त्याच्यापाशी राहील,
- कदापि नाही, तो मनुष्य तर चक्काचूर करून टाकणार्या जागी फेकून दिला जाईल
- आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ती चक्काचूर करणारी जागा?
- अल्लाहचा अग्नी, खूप भडकलेला,
- जो हृदयापर्यंत पोहचेल,
- तो त्यांच्यावर झाकून बंद केला जाईल.
- (अशा अवस्थेत की ते) उंचउंच स्तंभात (वेढले गेले असतील)