105. अल् फील - ٱلْفِيل
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्याशी काय केले?
- काय त्याने त्यांची युक्ती फोल ठरविली नाही?
- आणि त्यांच्यावर पक्षांचे थवेच्या थवे पाठविले
- जे त्यांच्यावर खंगराच्या खड्यांचा मारा करीत होते.
- मग त्यांची अशी दशा करून टाकली जसा (जनावरांनी) खाल्लेला भूसा.