87. अल् आला - ٱلْأَعْلَىٰ
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- (हे पैगंबर (स.)) आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या नावाचे पवित्र्य गान करा
- ज्याने निर्माण केले व प्रमाणबद्धता प्रस्थापित केली.
- ज्याने भाग्य बनविले मग मार्ग दाखविला,
- ज्याने वनस्पती उगविल्या,
- मग त्यांना काळा केरकचरा बनवून टाकला.
- आम्ही तुम्हाला पठण करवू मग तुम्ही विसरणार नाही
- त्याखेरीज की अल्लाहने ज्याची इच्छा करावी. तो प्रकटही जाणतो आणि जे काही गुप्त आहे ते सुद्धा.
- आणि आम्ही तुम्हाला सुलभ पद्धतीची सवलत देतो,
- म्हणून तुम्ही उपदेश करा, जर उपदेश लाभदायक असेल.
- जो मनुष्य भितो तो उपदेश स्वीकारील
- आणि त्याच्यापासून अलिप्त राहील
- तो अत्यंत दुर्दैवी जो मोठ्या अग्नीत जाईल,
- मग तो मरणारही नाही व जिवंतही राहणार नाही.
- सफल झाला तो ज्याने पावित्र्य अंगिकारले
- आणि आपल्या पालनकर्त्याचे नामस्मरण केले. मग नमाज अदा केली.
- परंतु तुम्ही लोक ऐहिक जीवनाला प्राधान्य देता
- वास्तविकपणे परलोक उत्तम आहे आणि बाकी उरणारा आहे.
- हीच गोष्ट अगोदर आलेल्या पुस्तिकातसुद्धा सांगितली गेली होती.
- इब्राहीम (अ.) आणि मूसा (अ.) यांच्या पुस्तिकात.